There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
आपल्या हातून चुकाघडून त्याचे नुकसान होण्याआधीच त्या चुका थांबवणे शक्य आहे? हो आहे. तेच आपण शिकणार आहोत या प्रोग्राम मध्ये.
Language: Marathi
जागरूकता…. विचार करा की आपण टू व्हीलर, फोर व्हीलर चालवत शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागाकडे गेलो आणि आपण हे करताना गाणी ऐकत आहोत, गाडीत बसलेल्या इतरांशी गप्पा मारत आहोत आणि आपण जिथे हवं तिथे पोहोचलो. आपल्या लक्षात असतं का की, आपण किती सिग्नल्स पास केले, रस्त्यावर कुठली कुठली दुकाने होती. जेव्हा अचानक कोणतर समोर येतो तेव्हा आपण ब्रेक लावतो की आपोआप ब्रेक लावला जातो? जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा बऱ्यापैकी आपण automatic mode वर असतो.
पण हे फक्त त्याच वेळेला होतं असं नाही. जेव्हा एखादी व्यक्ती ठराविक पद्धतीने आपल्याशी बोलते तेव्हा अचानक आपला त्यांना ठराविक पद्धतीने रिप्लाय जातो. नंतर आपल्याला वाटतं की असं बोलायला नको होतं. ही गोष्ट तुम्ही बघितली असेल की समोर पाल आली तर, एखाद्याच्या मनात हे विचार येत नाहीत की ही पाल इतकी छोटीशी आहे आणि ती आपल्याला घाबरत आहे पण त्या आधीच आपण घाबरतो.
अशा भरपूर गोष्टी आपण बदलू शकतो जर आपण awareness वाढवला तर. पण ही गोष्ट step-by-step करावी लागते आणि सातत्याने करावी लागते. कशी करायची जाणून घेऊ या प्रोग्राम मध्ये.